समिधा

आनंदवनात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करून त्यांना सन्मानाने जगायला शिकवणाऱ्या आदरणीय बाबा आमटे यांच्या सहधर्मचारिणी साधना आमटे यांच्या आ

समिधा

लेखक- साधना आमटे
प्रकाशक- पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठे-१९६
किंमत- ₹३००


हे पुस्तक म्हणजे जगाला ज्ञात असणाऱ्या बाबा आमटे यांच्या सहधर्मचारिणी साधनाताई आमटे यांच्या आठवणी आहेत. आनंदवनाची स्थापना होण्या आधीच्या दिवसांची आठवण देखील यात आहे. बाबांची भेट, लग्नापूर्वीचे बाबा, त्यांचा एकंदर स्वभाव, त्यांचा तापटपणा तर ताईंचा मायाळू स्वभाव अशा परस्पर विरोधी भासणाऱ्या स्वभावांच्या दोन माणसांची ही एकत्र केलेली वाटचाल आहे. ताईंचा धर्मभोळा स्वभावही यात मधून मधून डोकावतो.
आनंदवनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून ते सोमनाथ, अशोकवन, हेमलकशा ते शेवटी नर्मदा तीराचं कासारवद आणि पुन्हा आनंदवन असा हा सगळा प्रवास आहे. यात त्यांना लाभलेल्या अनेक कार्यकर्त्यांची नावं आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मंडळींचा सहवास आमटे पती- पत्नींना लाभला त्यातल्या अनेकांचा आदरपूर्वक उल्लेख आहे. या दोघांनी घेतलेल्या कष्टाची वर्णनं वाचली की आपलं थोडकं सुख देखील फार मोठं वाटू लागतं. आपलं दुःख आपोआप दूर झाल्यासारखं होतं. साधनाताईंच्या लिखाणाला सीताकांत प्रभू यांनी सुंदर मांडणी देऊन आपल्या समोर आणलं आहे.