नमस्कार!
प्रणव पटवर्धन. विविध विषयांवर वाचन करणं, तो विषय जास्तीत जास्त चांगला समजून घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्यावर मनापासून लिहिणं ही या ब्लॉगमागची मुख्य प्रेरणा आहे.
या ब्लॉगवर तुम्हाला पुस्तक परीक्षणे, ऐतिहासिक लेख, चरित्र-आत्मचरित्रावरील विचार, प्रवासवर्णने, माहितीपर लेख आणि माझे स्वतंत्र विचार अशा विविध स्वरूपातील लेखन वाचायला मिळेल.
“वाचनातून विचार, विचारातून लेखन आणि लेखनातून संवाद.”
हा ब्लॉग केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नसून, वाचताना, पाहताना आणि अनुभवताना मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा आणि विचारांचा एक मुक्त संवाद आहे.